शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर बीग बजेट सिनेमा, कोण करणार निर्मिती?, कोण करणार बाळासाहेबांची भूमिका ?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर बीग बजेट सिनेमा, कोण करणार निर्मिती?, कोण करणार बाळासाहेबांची भूमिका ?

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत लवकरच एक बिग बजेट सिनेमा येणार आहे. या सिनेमाची घोषणा 21 डिसेंबरला होणार आहे. या चित्रपटाचे नावही बाळासाहेबांच्या व्यक्तीमत्वाप्रमाणे वजनदार असणार आहे. या सिनेमाची अधिकृत घोषणा 21 डिसेंबररोजी होणार आहे.

या सिनेमाची घोषणा उद्धव ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. बाळासाहेबांची व्यक्तिरेखा कोण साकारणार ? याबाबत उत्सुकता, सस्पेन्स कायम ठेवण्यात आला असून तो त्या दिवशीच उलगडणार आहे.. तसेच या सिनेमाची निर्मिती खासदार संजय राऊत हे करणार आहेत.  सिनेमाचे दिग्दर्शक कोण करणार याबाबतचा सस्पेन्स मात्र कायम आहे.

तसेच हिंदी आणि मराठी भाषेत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार असून या चित्रपटाच्या निर्मितीत बॉलीवुड आणि हॉलिवूडमधील दिग्गजांची टीम उतरणार आहे.  बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चित्रपट निर्मितीची शिवसेनेतच स्पर्धा लागल्याचं दिसून येत आहे. यापूर्वी ‘बाळासाहेब ठाकरे’ चित्रपटाची निर्मिती स्मिता ठाकरे यांनी केली असून त्याचं दिग्दर्शक राहुल ठाकरे यांनी केलं आहे.

 

COMMENTS