बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा जनसागर !

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर शिवसैनिकांचा जनसागर !

मुंबई –  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्मृती उद्यानावर आले आहेत.

शिवसैनिकांप्रमाणेच राजकारण, समाजकारण, उद्योग अशा विविध क्षेत्रातील मान्यवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेत स्थळाचं लोकार्पण करण्यात आले.

COMMENTS