महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचे कानावर हात!VIDEO

महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस चव्हाट्यावर, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांचे कानावर हात!VIDEO

मुंबई – महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. कारण मंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे?, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले, असा गौप्यस्फोट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केला होता.

तसेच सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिला होता. परंतु चव्हाण याॆच्या वक्तव्यावर काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कानावर हात लावले आहेत.संविधानाच्या चौकटीतच सरकार चालते, ते सगळ्यांना बंधनकारक आहे. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आणि संविधानांची बांधिलकी आहे, तसंच काम करु. देशात संविधानाला धक्का लावण्याचं काम सुरू असून अशोक चव्हाण यांनी नेमके काय विधान केले माहीत नाही ..आम्ही पाच वर्ष एकत्रित काम करणार हा मल्टिस्टारर सिनेमा यशस्वी होणार, पाच वर्षे आनंदाने काम करू असं थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान बाळासाहेब थोरात यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपोषणावरही वक्तव्य केलं आहे. मराठवाड्यातील योजना बंद झाली असं नाही, आम्ही आढावा घेत आहोत.विरोधी पक्षाची भूमिका ते वठवत आहे म्हणून आंदोलन आहे.
गेल्या पाच वर्षात त्यांनी भाषण केली, काम नाही, फक्त जाहिराती चांगल्या होत्या. आम्ही काम करू,चांगला न्याय देऊ असं थोरात म्हणालेत.

तसेच सरपंच निवडणुकीवरही थोरात यांनी वक्तव्य क्लं आहे.
आम्ही थेट सरपंच निवडीबाबत काही अभ्यास केला त्यानंतर निर्णय घेऊ. सरपंच निवडून आले पण खाली बहुमत नाही त्यामुळे काम होत नाही अशा तक्रारी आहेत. हा अनुभव आल्यावर हा निर्णय घेतला जातोय. अद्याप 9 हजार ग्रामपंचायत ठराव आलं अस आमच्याकडे आलेलं नाही.

राज ठाकरे यांनी लोकसभेच्या  निवडणुकीत जे काम केलं ते उल्लेखनीय होतं. आजही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतील. राज ठाकरे आपल्या विचारांशी तडजोड करतील असं वाटत नाही असंही थोरात म्हणालेत.

COMMENTS