बँक ऑफ चीनला भारतात पायघड्या !

बँक ऑफ चीनला भारतात पायघड्या !

देशविदेशातील अनेक बँकानंतर आता चीनमधील बँकही भारतात सुरू होणार आहे. आरबीआयने बँक ऑफ चीनला भारतात शाखा सुरु करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पीटीआयनं हे वृत्त दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या नेत्यांना बँक त्यांची बँक भारतात सुरू करण्यासाठी परवानगी देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार ही परवानगी देण्यात आली आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

भारत आणि चीन यांचे गेल्या काही दिवसांपासून संबंध ताणलेले आहेत. सीमेवर चीनकडून भारतावर नेहमी कुरघोडी केली जाते. त्यामुळे दोन्ही देशात नेहमीच तणाव असतो. आता या आर्थिक सहका-यामुळे तरी दोन्ही देशातील संबंध सुधारतील का हा प्रश्न आहे. तसंच आजपर्यंत चीनी बनावटीच्या वस्तूंचा भारतीयांनी अनुभव घेतलेला आहे. त्याप्रमाणे बँकाचा अनुभव असू नये एवढीच भारतीयांची अपेक्षा आहे.

COMMENTS