बारामती – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती तालुक्यातील माळेगावच्या घराजवळील दी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणी विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसली.विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी विरोधकांनी माईकचा ताबा मिळवला आणी उत्तर मिळेपर्यंत सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. त्या वेळी झालेल्या गोंधळात विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांना चांगलेच भिडले होते. यामध्ये पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा अनेक दिवस राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि त्यांचे पुतणे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यात होता. मागील पंचवार्षिक निवडणुकीत हा कारखाना भारतीय जनता पार्टीत असलेले कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे आणि जेष्ठ नेते चंदरआण्णा तावरे यांच्या ताब्यात आहे.
त्या वेळेपासुन कारखाना भाजपाच्या हातात आहे. माळेगाव येथील शरद पवार यांचे गोविंदबाग निवासस्थान आणि त्याच गावातील हा कारखाना आपल्या ताब्यात नाही. ही सल अजित पवार यांच्या मनात कायम आहे. राष्ट्रवादी वारंवार या कारखान्याला टारगेट करत असल्याचं बोललं जात आहे. आज वार्षिक सभेत त्यांनी संधी साधत सभेच्या कामकाजात अडथळा आणत सभेत गोंधळ घातला असल्याचा आरोप सत्ताधा-यांनी केला आहे.
COMMENTS