बारामतीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ!

बारामतीतील मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ!

बारामती – भाजपच्या महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचं दिसून आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘एकच वादा अजित दादा, एकच साहेब पवारसाहेब’ अशा घोषणा दिल्या आहेत. गोंधळ घालणाय्रा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी ताब्यात घेतलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जोपर्यंत सोडत नाहीत तोपर्यंत नारा देत राहणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीकडून घेण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला कालपासून नगरमधून सुरुवात झाली होती.ही यात्रा आता वादग्रस्त ठरत आहे.
कालच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर एका तरुणीनं
‘सीएम गो बॅक’च्या घोषणा देत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीवर शाईचा फुगा फेकला होता. शर्मिला येवले असं या तरुणीचे नाव असून ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. त्यानंतर आज बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आहे.

COMMENTS