भीमा कोरेगाव प्रकरणावरुन आठवलेंवर नाराजी, बार्शी तालुक्यातील कार्यकारिणीचा राजीनामा !

भीमा कोरेगाव प्रकरणावरुन आठवलेंवर नाराजी, बार्शी तालुक्यातील कार्यकारिणीचा राजीनामा !

सोलापूर – भीमा कोरेगाव प्रकरणानंतर सत्तेत असून कोणतीही भूमिका न घेतल्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात बार्शी तालुक्यातील आरपीआयच्या कार्यकारिणीनं राजीनामा दिला आहे. तसेच या सर्व कार्यकर्त्यांनी रामदास आठवले यांना पत्र लिहिलं आहे. सत्तेत असतानाही अन्यायाला वाचा फुटत नसल्यामुळे आमच्या पदाचे राजीनामे देत आहोत असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान भीमा कोरेगावमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतरही तुम्ही त्याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व कार्यकर्ते नाराज आहेत. सत्तेत असूनही अन्यायाला वाचा फोडण्याचं काम तुम्ही करत नाहीत. तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेत नाहीत. त्यामुळे आम्ही सर्व द्विधा अवस्थेत असून यापुढे आमची आपल्यासोबत राहुन कार्य करण्याची मानसिकता नसल्याचं या कार्यकर्त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.

 

COMMENTS