बीड जिल्ह्यात जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री आस्थापना ३ दिवस सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत चालू राहणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड जिल्ह्यात जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री आस्थापना ३ दिवस सकाळी ७ ते ९.३० वाजेपर्यंत चालू राहणार- जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड – कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता फौजदारी प्रकिया दंड सहिंता-१९७३ चे कलम १४४ नुसार संपूर्ण जिल्हयासाठी सर्व जिवनावश्यक वस्तुंची किरकोळ विक्री करणान्या आस्थापना दिनांक ०९, ११ व १३ एप्रिल २०२० या तारखेस सकाळी ७.०० वा पासून ते स.९.३० वा. पर्यंत चालू राहतील. या काळात शहरी भागामध्ये छोटा हत्ती, पिकअप ई. सह कोणत्याही स्वरुपात माल वाहतुक होणार नाही. तसेच माल वाहतुक करणारी कोणतीही वाहने चालवता येणार नाही असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहे.
कोरोना विषाणुचा वाढता प्रभाव लक्षात घेता बीड, अंबाजोगाई, परळी व माजलगांव या चार शहरांच्या व उर्वरीत जिल्हयाच्या हदृीत सर्व जिवनावश्यक वस्तुंच्या सेवा देणाऱ्या आस्थापना हया सम व विषम चालू राहतील असे आदेशीत करण्यात आले होते. पंरतु सदरील कालावधीत एकाच ठिकाणी गर्दी होत असल्याचे निर्दशनास आल्याने हे आदेश दिले आहेत.

अकरा शहरामधील घाऊक वितरक व होलसेल दुकानदार अस्थापनांसाठी स्वतंत्र वेळ
जिवनावश्यक वस्तूसह सर्व वस्तूंचे घाऊक वितरक व दुकानदार (Whole sellers / Distributers/ Suppliers) यांची दुकाने दिनांक ०९,११ व १३ एप्रिल २०२० रोजी स.०६.०० ते स. १०.३० या काळात बंद राहतील आणि ते कोणत्याही प्रकारची माल वाहतुक (उदा.पिकअप, छोटाहत्ती, इत्यादीसह) करणार नाहीत.

सर्व घाऊक वितरक व किरकोळ विक्रेते यांनी पोलीस विभागाकडून मिळालेले पास वापरुन सर्व किरकोळ विक्रेत्यांनी घाऊक विक्रेते ,वितरक (Whole sellers /Distributers/Suppliers) यांचेकडून आवश्यक ते सामान दि.०९,११ व १३ एप्रील रोजी स. 6 ते 10 वाजता ही वेळ वगळून प्राप्त करुन घ्यावे. तसेच ओषधे व इतर सर्व जिवनावश्यक वस्तूंचे (Whole sellers Distributers/ Suppliers) यांना त्यांच्या परवान्यावरुनच (Whole sellers / Distributers Suppliers) असे या आदेशापुरते समजण्यात येईल. भाजीपाला व फळे यांचे (Whole sellers) यांना सुध्दा सदरील नियम लागू राहतील.

सोबत जिल्हयातील सर्व अकरा शहरामधील व्यापारी संघटनेने दिलेली किराणा सामानाच्या (Wholesellers / Distributers Suppliers) यांची यादी आहे. त्यांना (Whole sellers / Distributers/ Suppliers) असे या कालावधीत मानण्यात येत आहे.

तसेच यापूर्वी निर्गमित केलेले आदेश,सुधारीत आदेश,सुधारणा आदेश अंमलात राहतील. यानुसार दिनांक १४ एप्रील २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत लागू करण्यात आले प्रतिबंधात्मक आदेश लागू आहे. वरील सवलती वगळता सर्वासाठी इतर सर्व काळात संचारबंदी कायम राहील.

COMMENTS