बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत राज्यातील ६० गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यास मंजूरी दिली. यात बीड जिल्हयातील ३८ ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय सर्व सोयींनी सज्ज असणे आवश्यक आहेत त्यामुळे ज्या गावांत ग्रामपंचायतीचे कार्यालय नाही, अशा गावांसाठी पंकजा मुंडे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नांवाने स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत आतापर्यंत राज्यातील ४७७ ग्रामपंचायतींना कार्यालये बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली असून आज आणखी ६० ग्रामपंचायतींना मंजूरी दिल्याने ती संख्या ५३७ एवढी झाली आहे. ज्या गांवची लोकसंख्या एक हजार पेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय बांधण्या करिता १८ लक्ष रूपये मंजूर करण्यात आले असून त्यातील ८५ टक्के म्हणजे १५ लक्ष ३० हजार एवढी रक्कम ग्रामविकास विभाग देणार असून उर्वरित २ लक्ष ७० हजार रू. संबंधित ग्रा. प. ने स्वनिधीतून आणि दोन हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या ग्रा. प. ना ८० टक्के रक्कम म्हणजे १४ लक्ष ४० हजार रू. ग्रामविकास विभाग देणार असून उर्वरित ३ लक्ष ६० हजार रू. ग्रामपंचायतीने स्वनिधीतून खर्च करून कार्यालय बांधायचे आहे.
बीड जिल्हयातील ३८ ग्रामपंचायती
पंकजा मुंडे यांनी आज मंजूर केलेल्या राज्यातील साठ ग्रामपंचायती पैकी ३८ ग्रामपंचायती हया बीड जिल्हयातील आहेत. या नव्या मंजूरीमुळे जिल्हयात मंजूर झालेल्या ग्रामपंचायतीची संख्या १३२ इतकी झाली आहे. या सर्व ठिकाणी १८ लक्ष रूपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यात येणार आहेत.
या गावांना मिळणार नवी इमारत
आज मंजूर झालेल्या जिल्हयातील ज्या ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाची नवी इमारत बांधली जाणार आहे, ती तालुकानिहाय गांवे पुढीलप्रमाणे अंबाजोगाई (१०) मुर्ती, अंबलवाडी, भतानवाडी, धसवाडी, कातकरवाडी, डोंगर पिंपळा, मांडवा पठाण, साकूड, शेपवाडी, पट्टीवडगाव, परळी (१४) तेलसमुख, वंजारवाडी, अस्वलंबा, लिंबोटा, लोणी, मैंदवाडी, वाघाळा, वान टाकळी, मालेवाडी, बेलंबा, हेळंब, लाडझरी, नागदरा, मांडवा, आष्टी (३) पाटसरा, मसोबाची वाडी, हातोला, बीड – वडगाव (बु), धारूर – बोडखा, गेवराई – गायकवाडी जळगाव, केज – लाडेवडगाव, माजलगाव- खानापूर, पाटोदा – काकडहिरा, येवलवाडी ना., शिरुर का. – राळेसांगवी, माळेगाव चकला, वडवणी – कोठरबन, पिपळा रुई या ग्रामपंचायतींना नवीन कार्यालय देण्यात आलं आहे.
COMMENTS