लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जय्यत तयारी, धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत तालुकानिहाय बैठका !

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जय्यत तयारी, धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत तालुकानिहाय बैठका !

बीड – बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांची उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस – काँग्रेस आघाडीने निवडणुकीच्या जय्यत तयारीस सुरूवात केली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार दि.16 मार्च पासून 2 दिवस तालुकानिहाय मॅरेथॉन बैठका घेण्यात येणार आहेत.

शनिवार, दि.16 मार्च आणि रविवार, दि.17 मार्च रोजी जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, शिरुर, गेवराई, माजलगाव, वडवणी, धारुर आणि केज याठिकाणी होणार्‍या बैठकांमध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते धनंजय मुंडे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

शनिवार, दि.16 मार्च रोजी सकाळी 10 वा. पाटोदा, दुपारी 1 वा. आष्टी, दुपारी 4 वा. शिरुर आणि सायं.7 वा. गेवराई येथे तर रविवार, दि.17 मार्च रोजी सकाळी 10 वा. माजलगाव, दुपारी 1 वा. वडवणी, दुपारी 4 वा. धारुर आणि सायं.7 वा. केज या ठिकाणी निवडणुक नियोजनासाठी कार्यकर्त्यांच्या बैठका होणार असल्याची माहीती सोनवणे यांनी दिली.

माजीमंत्री प्रकाशदादा सोळुंके, माजी आ. अमरसिंह पंडित, संदीप क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे, सतिष शिंदे, उषाताई दराडे, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, चंपावतीताई पानसंबळ, महेंद्र गर्जे, जयसिंग सोळुंके, डॉ.शिवाजी राऊत तर कॉंग्रेसच्या वतीने माजी खा.रजनीताई पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, माजी आ.सुरेश नवले, माजी आमदार सिराज देशमुख, ज्येष्ठ नेते प्रा.टी.पी.मुंडे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पुर्वतयारीसाठी आयोजित केलेल्या तालुकानिहाय बैठकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आणि कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. बीड लोकसभा मतदार संघातून आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी करावयाच्या नियोजनासाठी कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS