आ. अमरसिंह पंडित यांच्याविरोधात खोटी तक्रार देणा-या पुरवठा अधिका-याचं निलंबन !

आ. अमरसिंह पंडित यांच्याविरोधात खोटी तक्रार देणा-या पुरवठा अधिका-याचं निलंबन !

मुंबई – अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून तक्रार केल्याचा राग मनात धरून आमदार अमरसिंह पंडित व त्यांच्या पीएविरधात खोटी तक्रार देणा-या बीडच्या जिल्हा पुरवठा अधिकारी एन. आर. शेळके यांचं आज विधान परिषदेत निलंबन करण्यात आलं आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सभागृहात सदस्यांनी जनतेचे प्रश्न मांडायचे नाहीत काय ?  अधिकाऱ्यांना एवढी मस्ती कशी आली आहे असा सवाल उपस्थित केला होता.  आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरोधात खोटी तक्रार करणा-या शेळके यांस निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत आजच्या आज या अधिका-याचं निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्याविरोधात जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. नरहरी शेळके यांनी खंडणीखोरीची तक्रार दाखल केली होती. तसे त्यांचे स्वीय सहाय्यक जालिंदर राऊत यांच्याविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार दाखल केली होती. ‘पंडित हे महसूल मंत्र्यांकडे तुमच्याविरुद्ध तक्रार करणार आहेत. तेव्हा त्यांची भेट घेऊन तोडपाणी करा,’ असा निरोप सुभाष पाटील नावाच्या व्यक्तिने आपल्याकडे पोहचवला होता असा आरोप शेळके यांनी केला होता. परंतु या आरोपानंतर त्यांचं अखेर निलंबन करण्यात आलं आहे.

 

 

COMMENTS