बीड – उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीच्या निकालाची तारीख जाहीर झाली असून येत्या सोमवारी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून मतमोजणी लांबणीवर पडली होती. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11 तारखेला लागणार असून याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने माहिती दिली आहे. तसेच यापूर्वीच निवडणूक आयोगाने 11 तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या सहा जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकांचे निकाल 24 मे रोजी जाहीर करण्यात आले होते. मात्र बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणी हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्यामुळे थांबवण्यात आली होती. परंतु या निवडणुकीच्या मतमोजणीचा मार्ग आता मोकळा झाला असून या निवडणुकीचा निकाल येत्या सोमवारी लागणार आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली आहे.
COMMENTS