भेट आणि मन की बात, शाह-उद्धव भेटीवर राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

भेट आणि मन की बात, शाह-उद्धव भेटीवर राज ठाकरेंचं व्यंगचित्र !

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर आणखी एक व्यंगचित्र काढलं आहे. या व्यंगचित्राला भेट आणि मन की बात असं टायटल त्यांनी दिलं आहे. या व्यंगचित्रा अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची गळाभेट दाखवण्यात आली आहे. तसेच या भेटीदरम्यान हे दोघंही एकमेकांच्या पाठीत सुरा खुपसत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या खिशात राजीनामे असल्याचा उल्लेखही राज ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी काढलेलं व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. या व्यंगचित्राद्वारे राज ठाकरे यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या मनकी बातवर व्यंगचित्राद्वारे फटकारे लगावले आहेत. त्यामुळे राज यांनी काढलेल्या या व्यंगचित्राबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

COMMENTS