मुंबई – भीमा कोरेगावच्या घटनेमुळे झालेल्या आंदोलनात एसटी महामंडळाला तब्बल २० कोटी रुपयांचा फटका बसला आहे. आंदोलनात सलग दोन दिवस एसटीच्या २१७ बसेसची मोडतोड झाली असून त्याचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच या बंद काळात २५० आगारापैकी २१३ आगारक्षेत्रीतील बहुतांश एसटीची वाहतूक ठप्प झाल्यामुळे १९ कोटी रुपयाचं महसूल बुडाला असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.
या काळात जरी आर्थिक नुकसान झाले असले तरी, आंदोलन कर्त्यांच्या भावनांचा आदर राखत आम्ही एसटीचे झालेले नुकसान आंदोलनकरर्त्यांकडून न घेता एसटी स्वत: सोसणार असल्याचं प्रतिपादन रावते यांनी दिलं आहे. तसेच या काळात एसटीची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे जे अतोनात हाल झाले त्याबद्दल त्यांनी एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने ‘ दिलगिरी ‘ व्यक्त केली आहे.
COMMENTS