काँग्रेसला मोठा धक्का, पाच आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी !

काँग्रेसला मोठा धक्का, पाच आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी !

नवी दिल्ली – गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला चांगलीच टक्कर दिली. यावरुन देशभरात काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत बनत चालल्याचं दिसत होतं परंतु काँग्रेसला मेघालयामध्ये मात्र मोठा झटका बसला आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन थेट शिलाँगमध्ये भाजपचा सहयोगी पक्ष असलेल्या नॅशनल पिपल्स पार्टीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे काँग्रेसचे 10 सदस्यही एनपीपीमध्ये गेले असल्याची माहिती आहे. ६ मार्चरोजी विधानसभा निवडणुका होणार असल्यामुळे या आमदारांनी त्यापूर्वीच राजीनामा देऊन एनपीपीची ताकद वाढवली आहे.

 

 

दरम्यान काँग्रेसच्या पाच आमदारांबरोबरच इतर पक्षातील आठ आमदारांनीही मागच्या महिन्यात राजीनामा देऊन एनपीपीमध्ये प्रवेश केला आहे. एनपीपीमध्ये सहभागी झालेल्या आमदारांमध्ये काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री रोवेल लिंग्दोह, सनिआवभालंग धर, कमिनगोन यंबोन, प्रोस्टोन तेनसोंग आणि न्गैतलांग धर तसेच युनायटेड डेमोक्रेटिक पक्षाचे रेमिंगटन पिनग्रोप, अपक्ष स्टीफेंसन मुखिम आणि होफुल बामन यांचा समावेश आहे.काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात पक्षाची हळूहळू ताकद वाढत असल्याचं दिसत आहे. परंतु शिलाँगमध्ये मात्र काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण होत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS