लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया !

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत छगन भुजबळांची प्रतिक्रिया !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरोदार तयारीला लागले आहेत. कोणत्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची याबाबतही पक्षश्रेष्ठींकडून चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं आढावा बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान राज्यातील लोकसभा मतदारसंघावर चर्चा करण्यात आली. काही नेत्यांनी विविध मतदारसंघावर आपला दावा केला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याबाबतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र, शेवटी सर्व निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद पवार घेतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीर मतदारसंघात सर्वेक्षण करुन, परिस्थिती पाहून निर्णय घेतले जातात. त्यामुळे शरद पवारच योग्य निर्णय घेतील असं भुजबळांनी म्हटलं आहे.

दरम्यान नाशिक किंवा धुळे मतदारसंघातून छगन भुजबळ यांनी लढावे, अशी दोन्ही जिल्ह्य़ांतील नेत्यांची मागणी होती. पण स्वत: भुजबळ राज्याच्या राजकारणातच राहावे या मताचे आहेत. त्यामुळे आताच्या वक्तव्यावरुन भुजबळ हे लोकसभा लढणार नाहीत. गेल्या वेळी नाशिक मतदारसंघातून भुजबळांचा पराभव झाला होता.

तसेच यावेळी भुजबळ यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे. शिवसेनेने आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. किती दिवस तळ्यात मळ्यात करायचे याला सीमा असते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी कधीच कमळाबाईपासून फारकत घेतली असही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

COMMENTS