छगन भुजबळांना झेडप्लस सुरक्षेची मागणी !

छगन भुजबळांना झेडप्लस सुरक्षेची मागणी !

मुंबई – मनीलॉन्ड्रींग केसमध्ये तब्बल सव्वादोन वर्षानंतर जामीन मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत जाधव यांनी केली आहे. भुजबळ यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी सरकारकडे भुजबळांसाठी झेडप्लस सुरक्षेची मागणी केली आहे.

आमदार जयंत जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन भुजबळ यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात त्याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS