भाजप एक अर्ज मागे घेणार, विधान परिषद बिनविरोध होणार !

भाजप एक अर्ज मागे घेणार, विधान परिषद बिनविरोध होणार !

नागपूर – विधान परिषदेच्या निवडणुक बिनविरोध होणार आहे. ११ जागांसाठी आता केवळ ११ उमेदवार रिंगणात राहणार असल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. भाजपाकडून डमी म्हणून अर्ज भरलेले पृथ्वीराज देशमुख आज अर्ज मागे घेणार आहेत. भाजपच्या वतीने रविवारी रात्री उशीरा हा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या ५ जागा निवडूण येत असताना त्यांनी सहा अर्ज भरले होते. त्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता होती. मात्र भाजपच्या या निर्णयामुळे ती मावळली आहे.

पशू संवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून अर्ज भरला आहे. जानकर यांनी भाजपकडून अर्ज भरावा अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा होती. त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना अर्ज भरायला सांगितला होता. त्यामुळे जानकरांचं काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. भाजप काय निर्णय घेणार या विषयी उत्सुकता लागली होती. आता या निर्णयामुळे ती मावळली आहे. भाजपचे ४, शिवसेना, काँग्रेस यांचे प्रत्येकी २, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांचे प्रत्येकी १ उमेदवार रिंगणात आहेत.

COMMENTS