मुंबई – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापत असल्याचं दिसत आहे. राजकीय नेते आपल्या प्रतिस्पर्ध्यावर जोरदार आरोप करत आहेत. आघाडीचे नेते महायुतीतील नेत्यांवर तर महायुतीतील नेते आघाडीतील नेत्यांवर आरोप करत आहे. कधी प्रचारसभांच्या माध्यमातून तर कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत. सोशल मीडियाच्या या लढाईत भाजने बाजी मारली असल्याचं दिसत आहे. भाजपकडून रम्या नावाच्या पात्राद्वारे व्यंगचित्राच्या माध्यमातून विरोधकांवर फटकारे ओढले जात आहेत.
परंतु आता भाजपनं व्यंगचित्राच्या माध्यमातून थेट व्यंगचित्रकार असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरच ताशेर एढले आहेत. त्यांना ‘विरोधी पक्ष नेता’ व्हायचंय, पण जनतेने त्यांना ‘विनोदी पक्ष नेता’ केलंय. अनाकलनीय असल्याचं ट्वीटमध्ये भाजपनं म्हटलं आहे.
त्यांना 'विरोधी पक्ष नेता' व्हायचंय, पण जनतेने त्यांना 'विनोदी पक्ष नेता' केलंय ….
अनाकलनीय….!@RajThackeray pic.twitter.com/nU0LHp7rKc— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) October 11, 2019
COMMENTS