नांदेड – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली असल्याचं दिसत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बालेकिल्ल्यात भाजपकडून शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर रिंगणात उतरणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि प्रताप पाटील यांच्या भेटीत ही उमेदवारी फायनल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान प्रताप पाटील चिखलीकर हे लोहा-कंधार विधानसभेचे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेकडून निवडून आल्यानंतर ते मुख्यमंत्री फडवणीस यांचे समर्थक बनले, ते आजतागायत कायम आहेत. यापूर्वी एकदा अपक्ष आमदार म्हणून ते याच मतदारसंघात निवडून आले होते. त्यांचा मतदारसंघ लातूरमध्ये येत असला तरी काँग्रेसला टक्कर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना नांदेडमध्ये उमेदवारी देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे याठिकाणी चिखलीकर यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसची डोकेदुखी वाढणार असल्याचं दिसत आहे.
COMMENTS