कोणाची किती लायकी आहे ती निवडणुकीनंतर समजेल, गोपीचंद पडळकर यांचा भाजप नेत्याला इशारा!

कोणाची किती लायकी आहे ती निवडणुकीनंतर समजेल, गोपीचंद पडळकर यांचा भाजप नेत्याला इशारा!

सांगली – माझी लायकी काढणारे संजय काका पाटील मी तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे, आत्ता कळेल कुणाची किती लायकी आहे. ती असा इशारा धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. माझा पक्ष अजून निश्चित नाही, मात्र जो पक्ष देईल ती उमेदवारी घेणार, नाही तर अपक्ष लढणार, मात्र मी निवडणूक नक्की लढवणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे.

भाजपच्या नेत्यांना माझं आवाहन आहे की, भाजपची उमेदवारी संजय पाटील यांना जाहीर करा, लायकी कुणाची काय आहे हे जनता दाखवेल. खासदार संजय काका पाटील यांनी भाजपात राहून, पक्षा विषयी गद्दारी केली आहे. तुम्ही संजय काका पाटील खासदार असताना सुद्धा, 2014 ला तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातुन भाजपचे उमेदवार अजितराव घोरपडे हे 28 हजारानी मतांनी हरले कसे ? तुमची त्याच वेळेला लायकी कळली होती. असंही गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS