भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक, सरकार विरोधी वाढत्या नाराजीवर होणार चर्चा ?

भाजपाच्या कोअर कमिटीची आज बैठक, सरकार विरोधी वाढत्या नाराजीवर होणार चर्चा ?

मुंबई – भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, एकनाथ खडसे हे नेते हजेरी लावणार आहेत. शेतकरी कर्जमाफी, त्याविषयी शेतक-यांमधील प्रतिक्रिया,  जनतेमध्ये सरकारविरोधी वाढू लागलेली नाराजी,  विरोधकांचे आव्हान, हिवाळी अधिवेशनातील रणनिती यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राणेंचा मंत्रिमंडळातील समावेश आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेचा राणेंना असलेला विरोध विचारात घेता याबाबाबत काय निर्णय घ्यावा अशी कोंडी भाजपची झाल्याचंही बोललं जातंय.

COMMENTS