“मी लाभार्थी जाहिरातीची मला लाज वाटते, आमचं सरकार लोकांना फसवत आहे”

“मी लाभार्थी जाहिरातीची मला लाज वाटते, आमचं सरकार लोकांना फसवत आहे”

औरंगाबाद –  हे वक्तव्य सत्ताधारी पक्षातल्या कोण्या छोट्या नेत्याचं नाही तर हे वक्तव्य आहे, सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं. आमचं सरकार जनतेला फसवत आहे, मी लाभार्थी या जाहिरातीची मला लाज वाटते अशा शब्दात उद्धव यांनी सरकारवर हल्लाबोल केला. कर्जमाफी होणार आणि दिवाळी गोड जाणार असं आश्वासन सरकारनं दिलं, दिवाळी संपून अनेक दिवस उलटले तरी शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. केवळ जाहीरातबाजी सुरू असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

जो शेतकरी कर्जमाफी मिळली नाही असे म्हणतो त्याला तुम्ही देशद्रोही ठरवणार का ? असा सवालही उद्धव यांनी सरकारला केला. कर्जमाफी योजनेला शिवाजी महाराजांचे नाव दिले आहे. त्याला आम्ही काळिमा फासू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही जनतेला बांधिल आहोत, सरकारला नाही असंही ते म्हणाले. दिवंगत नेते रायभान जाधव यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

COMMENTS