“गुजरात ट्रेलर, राजस्थान मध्यांतर, 2019 मध्ये भाजपच्या समाप्तीचा सिनेमा !”

“गुजरात ट्रेलर, राजस्थान मध्यांतर, 2019 मध्ये भाजपच्या समाप्तीचा सिनेमा !”

मुंबई   गुजरात निवडणूक हा ट्रेलर होता तर राजस्थान पोटनिवडणूक मध्यांतर आहे. यानंतर तुम्हाला आता थेट भाजपच्या समाप्तीचा सिनेमा पहायला मिळणार असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आम्ही धनुष्यातून बाण सोडला आहे, २०१९ ला भाजपचा क्लायमॅक्स असेल, अशी भविष्यवाणी राऊत यांनी केली आहे.

दरम्यान खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा स्वतंत्र लढणार असल्याचं स्पष्ट केलं असून आमच्या धनुष्यातून बाण सुटला आहे, तो आता मागे घेणे शक्य नाही असं राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. गुजरात निवडणुकीत ट्रेलर पाहिला आणि आता राजस्थान पोटनिवडणुकीत मध्यांतर पाहायला मिळाले आहे. आता २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमात भाजपचा क्लायमॅक्स पाहायला मिळेल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS