भाजपच्या माजी खासदाराचं कोरोनामुळे निधन!

भाजपच्या माजी खासदाराचं कोरोनामुळे निधन!

मुंबई – कोरोनामुळे भाजपच्या माजी खासदाराचं निधन झालं आहे. भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं निधन झालं आहे. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 67 वर्षांचे होते.  हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

जळगावमध्ये त्यांची स्वॅबची चाचणी केली असता कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावळे यांना उपचारासाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

दरम्यान हरिभाऊ जावळे यांची जानेवारी 2020 मध्ये जळगाव जिल्ह्याच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली होती. ते दोन वेळा जळगावमधून खासदार म्हणून निवडून आले होते. तसंच त्यांनी दोन वेळा त्यांनी विधानसभा निवडणूकही जिंकली होती. त्यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.

COMMENTS