भाजपला धक्का, आणखी एका मित्र पक्षाने सोडली साथ !

भाजपला धक्का, आणखी एका मित्र पक्षाने सोडली साथ !

दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसला आहे. आणखी एका मित्र पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. एनडीएमधून बाहेर पडण्याचा अजून निर्णय झाला नसला तरी आगामी काळात ते एनडीएमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये डाव्या पक्षांची सत्ता उलथवून टाकण्यामध्ये भाजपची मदत करणारा आणि सत्तेत सहभागी असलेला इंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा ( आयपीएफटी) या पक्षाने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय आयपीएफटी या पक्षाने घेतला आहे.

गेल्या जानेवारीमध्ये या दोन्ही पक्षात निवडणूक पूर्व आघाडी झाली होती. दोन्ही पक्षांनी एकत्र येत अनेक वर्षांची डाव्या पक्षाची सत्ता उलथून टाकली होती. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपल्याला विश्वासात न घेता दोन्ही जागांवरील उमेदवार ठरवले त्यामुळे नाईलाजाने आपण भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे असं आयपीएटी पक्षातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तर फक्त विधानसभा निवडणुकीसाठीच युती होती असं भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आलंय. शिवसेना, टीडीपी यासारख्या पक्षानंतर भाजपला हा आणखी एक धक्का समजला जात आहे.

COMMENTS