संतापलेल्या भाजप नेत्याचा अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा प्रयत्न ! VIDEO

संतापलेल्या भाजप नेत्याचा अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा प्रयत्न ! VIDEO

नवी दिल्ली – एका भाजप नेत्याचा वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील संभल येथील हा  व्हिडीओ असून या व्हिडीओत भाजप नेता एका अपंगाच्या तोंडात काठी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. अपंग व्यक्ती भाजपाविरोधात बोलत असल्यामुळे संतापलेल्या या नेत्यानं अपंग व्यक्तिला त्रास दिला असल्याचं समोर आलं आहे. अमरोहा येथील भाजपा नेता मोहम्मद मियॉ असं या भाजप नेत्याचं नाव आहे. त्याच्यावर देशभरातून टीका केली जात आहे.

दरम्यान अपंग व्यक्ती नशेत होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप आम्हाला याप्रकरणी कोणतीही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. जर तक्रार आली तर कारवाई केली जाईल असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS