मुंबई – भाजपच्या दोन ज्येष्ठ आमदाराचे 59 लाख रुपयांचे घरभाडे सरकारने माफ केले असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विजयकुमार गावितांकडे सरकारी निवासस्थानाचे थकलेले ५९ लाख रुपये भाडे सरकारने माफ केले असल्याची माहिती आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबतची माहिती माहिती अधिकारातून उघड केली आहे.
दरम्यान एकनाथ खडसे यांचे १५.४९ लाख तर डॉ विजयकुमार गावितांचे ४३.८४ लाखांचे भाडे माफ करण्यात आली असल्याची माहिती यामध्ये देण्यात आली आहे. भाजपाच्या या दोन्ही ज्येष्ठ आमदारांनी दंडात्मक रक्कम माफ करण्याची शासनाकडे विनंती केली होती. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. “विशेष बाब” अंतर्गत शासनाने ५९ लाख रुपये माफ केले आणि याबाबतीत सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी करत तसा सूचना सार्वजनिक बांधकाम खात्यास दिल्या असल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांनी रामटेक या शासकीय बंगल्याचे थकित भाडे १५,४९,९७४ भरले नाही. खडसे यांनी मंत्री पदाचा राजीनामा ४ जून २०१६ रोजी दिला आणि बंगला दिनांक १९ नोव्हेंबर २०१६ रोजी रिक्त करत शासनाच्या ताब्यात दिला होता. त्यानंतर त्यांनी भाडे माफ करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीनंतर २६ मार्च २०१८ रोजी खडसे यांची विनंती विशेष बाब म्हणून शासनाने मान्य केली आहे. तर आघाडी सरकारच्या काळातील मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी ३३३० चौरस फुटाची ‘सुरुचि’ सदनिका रिक्त केली नसल्याची माहिती आहे.
तसेच गावित यांनी २० मार्च २०१४ रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि दिनांक २९ जुलै २०१६ रोजी सदनिका रिक्त केली होती. भाड्यापोटी ४३ लाख ८४ हजार ५०० इतकी रक्कम गावित यांनी भरली नाही. त्यानतंर त्यांनी भाडे माफ करण्याची विनंती दिनांक २९ जुलै २०१८ रोजी केली होती. त्यानंतर २२ ऑक्टोबर २०१८ रोजी गावित यांचे विनंती विशेष बाब म्हणून शासनाने मान्य केली असल्याची माहिती माहिती अधिरातून दिली आहे.
COMMENTS