अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे जाणार शिवनेरी किल्ल्यावर !

अयोध्येला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे जाणार शिवनेरी किल्ल्यावर !

मुंबई – ‘नियोजीत अयोध्या दौ-यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर जाणार आहेत. राम जन्म भूमीवर उद्धव ठाकरे महाराष्ट्राचं अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवरील माती एका कलशात भरून अयोध्येतील राम जन्मभूमीतील महंताना देणार आहेत. शिवनेरी किल्यावरील ती माती राम जन्म भूमीत मंदिर निर्माणासाठी देणार आहेत. उद्या सकाळी ९ वाजता किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे पोहचणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत २५ नोव्हेंबर रोजी जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता सेनेकडून अयोध्या दौऱ्याची तयारी सुरू आहे. नियोजित अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवरायांचा आशीर्वाद घेऊन अयोध्येला रवाना होणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौ-याच्या तयारीसाठी शिवसेनेच खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे अयोध्येत दाखल झाले आहेत.

COMMENTS