पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत नितीन गडकरींचं स्पष्टीकरण !

पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत नितीन गडकरींचं स्पष्टीकरण !

मुंबई – पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मला कुवतीपेक्षा जास्त मिळाले असून मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्टीकरण गडकरींनी दिले आहे. तीन राज्यांमधील पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावर नितीन गडकरी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहेत, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले होते. नितीन गडकरी यांनी देखील ‘नेतृत्वाने पराभवाचीही जबाबदारी स्वीकारावी’, असे सूचक विधान केल्यामुळे आगामी निवडणुकांसाठी नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाच्या चर्चेत होते. परंतु त्यांनी आज अखेर स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढला. मी जे विधानच केले नाही, ते माझ्या नावावर चालवण्यात आले. मी कोणत्याही स्पर्धेत नाही. मी माझ्या मनानुसार आयुष्य जगतो. मी कोणाच्या इशाऱ्यावर भाष्य करत नसल्याचंही गडकरी यांनी म्हटलं आहे. २०१४ च्या तुलनेत आगामी निवडणुकीत भाजपाप्रणित ‘एनडीए’ला जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

 

COMMENTS