भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी, “तुझी खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही !”

भाजपच्या महिला नेत्याची काँग्रेसच्या मंत्र्याला धमकी, “तुझी खांडोळी केल्याशिवाय राहणार नाही !”

कर्नाटक – भाजपाच्या एका महिला नेत्याने काँग्रेसच्या मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावर्जनिक कार्यक्रमात धमकी दिल्यामुळे कर्नाटकमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. भाजपच्या नेत्या दिव्या हगरग्गी यांनी काँग्रेसचे मंत्री एम.बी.पाटील यांना धमकी दिली असून मी तुझी खांडोळी करुन तुरूंगात जायला घाबरत नाही अशी धमकी दिली आहे. त्यांनी दिलेल्या धकमकीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान काँग्रेसने लिंगायत समाजाला अल्पसंख्यांक दर्जा देण्याची घोषणा केल्यानंतर हगरग्गी यांनी एम बी पाटील यांनी ही धमकी दिली आहे. जर तुमच्यात हिंमत असेल तर वीरशैव महासभेत या. तुम्ही आमच्या धर्मांत हस्तक्षेप केला आहे. आम्हाला कुठल्या पुरूषाच्या मदतीची गरज नाही. आम्ही महिलाच तुम्हाला उत्तर देण्यास सक्षम आहोत. जर आमच्या हाती तलवार दिली तर तुमची खांडोळी करू असं त्यांनी म्हटलं आहे. या वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हगरग्गी यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS