भाजपल धक्का, आणखी एक नेता बंडखोरीच्या तयारीत !

भाजपल धक्का, आणखी एक नेता बंडखोरीच्या तयारीत !

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.  भाजपमध्ये असणारे धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर हे नाराज असून ते बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. परंतु जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी उद्या दुपारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी चर्चा करून निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान माढातून धनगर नेते उत्तम जानकर यांना आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा होती. मात्र राजकीयदृष्ट्या निवडून येण्याची क्षमता म्हणून निंबाळकर उमेदवारी दिली असल्याची माहिती आहे. माढा लोकसभा मतदारसंघात चार लाख धनगर समाज आहे आणि याच धनगर समाजाचे मतदान आपल्याला पडेल अशी आशा जानकर यांना आहे. त्यामुळे जानकर आता काय निर्णय घ्णार हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS