मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत. परंतु भाजपचे ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळं त्यांच्याच पक्षातील एकनाथ खडसेंसारखे नेते दु:खी आहेत. हेच दु:खी नेते लवकरच आमच्याकडे येतील थोरात यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे. त्यांची नाराजी अनेकवेळा उघडपणे दिसली आहे. अनेक मुद्द्यांवरुन त्यांनी सरकारवर जाहीरपणे सरकारवर टीकाही केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतही दिसले होते. त्यामुळे नाराज असलेले खडसे लवकरच काँग्रेसमध्ये येतील असा दावा थोरात यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेसमधून लोकं बाहेर पडतात ही गोष्ट खरी आहे. पण नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि यातूनच काँग्रेसला पालवी फुटेल अशी आशा थोरात यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजप हा राजकीय पक्ष नसून सत्तेची भूक असलेला बकासूर आहे. काही केल्या त्यांची भूक भागत नसल्याची टीकाही थोरात यांनी केली आहे.
COMMENTS