भाजपाचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर 

भाजपाचे नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर 

नवी दिल्ली – भाजपासह देशातील प्रमुख नेते दहशतवाद्यांच्या रडावर असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझूहरने या ‘मिशन’साठी खास गट तयार केला आहे.

वरिष्ठ केंद्रीय मंत्री आणि काही मुख्यमंत्री दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती गुप्तचर यंत्राणांना मिळाली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार ज्या मुख्यमंत्र्यांना कमी सुरक्षा त्यांनाच लक्ष्य करण्याची योजना या दहशतवादी संघटनांनी आखली आहे. यासाठी बांगलादेश कॅडरमधील दहशतवाद्यांची मदत घेतली जात आहे. यातील काही दहशतवाद्यांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

COMMENTS