नवी दिल्ली – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. दोन्ही निवडणूका स्वतंत्र होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी याबाबत स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत. त्यामुळे राज्यातील आणि देशातील कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर झाला असल्याचं दिसत आहे.
दरम्यान गेली काही दिवसांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. पक्षाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक निर्णय जाहीर करतील अशी राज्यातील नेत्यांमध्ये भीती होती. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रम संपवा अशी राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली होती. त्यानंतर केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वतंत्र होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
COMMENTS