आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नवीन चेह-यांना संधी !

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी देणार नवीन चेह-यांना संधी !

जालना – राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन चेह-यांना संधी दिली जाणार असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे. राष्ट्रवादी हा नवीन चेह-यांना संधी देणारा पक्ष असून येणा-या निवडणुकांमध्ये नवीन चेहर्‍यांना, तरुणांना संधी दिली जाणार असून या संधीचं सोनं करण्यासाठी तरुणांनी सज्ज व्हावे असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे. ते घनसावंगी येथील सभेत बोलत होते.

दरम्यान यावेली बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

या देशात शेतक-याना कर्जमाफी देणारा एकच नेता शरद पवार आहेत. परंतु या सरकारने शेतकऱ्यांना फुटी कवडीही दिली नाही. पाच वर्ष झाली पण काळा पैसा आलेला नाही. या सरकारने फसवलं आहे, अशी मानसिकता देशातील जनतेची झाली आहे. हीच जनता आता या सरकारला घरचा रस्ता दाखवणार असल्याचंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS