भाजपला धक्का,  ‘या’ गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार !

भाजपला धक्का, ‘या’ गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार !

नाशिक – भाजपच्या विद्यमान खासदाराचं तिकीट कापल्यामुळे एका संपूर्ण गावानं मतदानावर बहिष्कार घातला आहे. दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चचंद्र चव्हाण यांचं तिकीट कापल्यामुळे सुरगाणा तालुक्यातील मालगव्हाण गावाने मतदानावरच बहिष्कार घातला आहे.
भाजपने तिकीट कापून त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवार यांना उमेदवारी घेषित केली. त्यामुळे या गावातील नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार घातला आहे.

दरम्यान चव्हाण यांनी आवाहन करूनही मालगव्हाण गावाने मतदानावर बहिष्कार कायम ठेवला आहे.   त्यामुळे चव्हाण यांंना उमेदवारी नाकारल्यामुळे मालगव्हाण गावातील नागरिक चांगलेच नाराज झाले असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो असं बोसयललं जात आहे.

COMMENTS