किरीट सोमय्यांना धक्का, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून  दुसय्रा उमेदवाराची चाचपणी ?

किरीट सोमय्यांना धक्का, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दुसय्रा उमेदवाराची चाचपणी ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे. सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केली असून सोमय्या यांचे नाव मंजूर झालेल्या १६ मतदारसंघांच्या उमेदवारांच्या यादीतही नसल्याची चर्चा आहे.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना-भाजपनं युती केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारे ईशान्य मुंबई मतदारसंघातील भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत आली असल्याचं दिसत आहे.

कारण राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेत ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी आणखी एक नाव सुचवावे, असे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. त्यानुसार सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस संसदीय मंडळाला करण्यात आली असल्याची माहिती आहे.

COMMENTS