भाजपला धक्का, ‘या’ नेत्याचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार !

भाजपला धक्का, ‘या’ नेत्याचा लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास भाजपच्या नेत्यानं नकार दिला असल्याचं दिसत आहे. भाजप नेते सुभाष देशमुखांनी माढ्यातून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरुन यूटर्न घेतला आहे. माढ्यातून लढणार असं केव्हा म्हणालो? अशा शब्दात सुभाष देशमुखांनी घुमजाव केलं आहे. शरद पवारांनी माढ्यातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भाजपनंही देशमुखांच्या निर्णयापासून माघार घेतल्याचं दिसतं आहे.

दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून सुभाष देशमुख यांना उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु यापूर्वीच देशमुख यांनी माघार घेतली असल्याचं तिसत आहे. तसेच राष्ट्रवादीकडून शरद पवार हे निवडणूक लढवणार होते परंतु पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामनळे भाजप आणि राष्ट्रवादीकडून नेमका कोण उमेदवार रिंगणात असेल हे स्पष्ट झालेलं नाही.

COMMENTS