शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पार्थ पवारांचा काढता पाय!

शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर पार्थ पवारांचा काढता पाय!

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर शरद पवार यांनी अद्याप शिक्कामोर्तब केलेले नसल्याचं दिसच आहे. शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांबरोबर आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी मावळमधून पार्थ यांचं नाव जाहीर झालं असलं तरी उमेदवारांची यादी अजून जाहीर व्हायची आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे मावळच्या उमेदवारीबद्दल सस्पेन्स अजून कायम आहे.

विशेष म्हणजे ह्या शिबिराला पार्थ पवार स्वतः उपस्थित होते. पवारांनी केलेले हे वक्तव्य ऐकूण पार्थने लगेचच शिबिरातून काढता पाय घेतला. त्यावेळी पार्थ पवारांनी मीडियाच्या प्रतिनिधींना मला माहिती आहे तुम्ही काय विचारणार असं म्हणत बोलणं टाळलं.

COMMENTS