माढा लोकसभेसाठी शरद पवारांविरोधात भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी पक्की !

माढा लोकसभेसाठी शरद पवारांविरोधात भाजपकडून ‘यांना’ उमेदवारी पक्की !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. यानंतर शरद पवारांविरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली जात होती. परंतु आता तगडा उमेदवार सध्या तरी भाजपकडे नसल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना पुन्हा तिकीट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे शरद पवार विरूद्ध सुभाष देशमूख असा सामना पहायाला मिळणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी शरद पवार यांच्यासमोर त्यांना मोठ्या पराभवला सामोरं जावं लागले होते.

तसेच २०१४ मध्ये भाजपाने मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला माढा मतदार संघ दिला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून येथून सदाभाऊ खोत यांनी दंड थोपटले होते. त्यावेळी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा सुभाष देशमुख यांचा शरद पवारांविरोधात सामना होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक मोठी रंगतदार होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS