नवी दिल्ली – महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका या मुख्यमंत्र्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जाणार आसल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शाह, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, महाराष्ट्र निवडणूक प्रभारी भुपेंद्र यादव, उपस्थित होते.
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका लढणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्यात महाजनादेश यात्रा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आगामी निवडणुकीत कितपत यश येणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
COMMENTS