पणजी – भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्याच्या घोषणेसाठी सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षातील आमदारांच्या बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे प्रमोद सावंत विराजमान होण्याची शक्यता असून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान प्रमोद सावंत हे सध्या गोवा विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रमोद सावंत साखळी मतदारसंघाचे आमदार असून ते व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.भाजप, गोवा फॉरवर्ड पार्टी यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला सहमती दर्शवली असून आज दुपारी सत्ताधारी भाजप आपल्या विधीमंडळ गटनेत्याची निवड करु शकतं असं बोललं जात आहे. त्यामुळे गोव्यातील राजकीय हालचालींकडे लक्ष लागलं आहे.
COMMENTS