अजितने सांगितलेली ‘ती’ गोष्ट मला आवडली नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत!

अजितने सांगितलेली ‘ती’ गोष्ट मला आवडली नाही, शरद पवारांनी व्यक्त केली खंत!

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात राजकीय पक्षांच्या सभा सुरु आहेत. काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडली आहे. या सभेत शरद पवार यांनी अजित पवारांची फिरकी घेत एक खंत व्यक्त केली आहे. साहेबांचं आता वय झालं असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले, अजितने सांगितलेली एक गोष्ट मला आवडली नाही, साहेबांचं वय झालं…अरे मी काय म्हातारा झालो का असा मिश्किल सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी नरेंद्र मोदी म्हणतात माझी 56 इंचाची छाती आहे. मात्र असं असताना मोदींना राफेलची कागदपत्र सांभाळता आली नाही. लोकांच्या मनात राफेलविषयी संशय आहे. तो संशय दूर झाला पाहिजे.
56 इंचाची छाती सांगतात आणि हल्ला झाला त्यानंतर आम्हाला सर्वपक्षीय बैठकीसाठी  बोलवून ते धुळ्याला येऊन भाषण देतात. अशी टीकाही यावेळी पवारांनी केली आहे.

COMMENTS