भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेत अस्वस्थता, अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर नाराजी!

भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर शिवसेनेत अस्वस्थता, अमित शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर नाराजी!

मुंबई – भाजपची काल दिल्लीत कोअर कमिटीची बैठक झाली.राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर यावेळी मंथन करण्यात आलं. या बैठकीनंतर शिवसेनेत अस्वस्थता असल्याचं दिसत आहे. विधानसभेसाठी शिवसेनेसोबत युती राहणार आहे, मात्र महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचाच हवा असं वक्तव्य अमित शाहांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता असल्याची चर्चा आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आशिष शेलार, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, सुभाष देशमुख आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

दरम्यान कालच्या बैठकीत अमित शहांनी राज्यातील नेत्यांना सूचना केल्या आहेत. राज्यात शिवसेनेसोबत युती होणारच आहे. लोकसभेला मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी काम केलं. तसंच विधानसभेला भाजपचा मुख्यमंत्री बनण्यासाठी करायचं आहे. केवळ आपल्याच जागांवर नव्हे तर मित्रपक्षाच्या ही जागा निवडून आणण्यासाठी तितकीच मेहनत करा, अशा सूचना अमित शाहांनी दिल्याची माहिती मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे यावर आता शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS