नवी दिल्ली – उद्योगमंत्री माझा छळ करत असल्याचं म्हणत आज सत्ताधारी भाजपच्या आमदार भर विधानसभेत रडल्या असल्याची घटना घडली आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेत ही घटना घडली असून उद्योगमंत्री राजेंद्र शुक्ल हे आपल्याला छळत असल्याचा आरोप आमदार नीलम मिश्रा यांनी केला आहे. तसेच आपल्याला सरकारने सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. यावर गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी नीलम मिश्रा यांना सुरक्षेचं आश्वासन दिलं असल्याची माहिती आहे.
दरम्यान विधानसभेचं कामकाज सुरू असताना हा प्रकार घडला. यावेळी सेमरिया मतदारसंघातील भाजपच्या आमदार नीलम मिश्रा या उभ्या राहिल्या आणि बोलू लागल्या. मंत्री राजेंद्र शुक्ल हे आपला छळ करत असल्याचं म्हणत त्या रडून लागल्या. भर सभागृहात महिला आमदार रडू लागल्याने वातावरण गंभीर झालं असल्याचं पहावयास मिळालं. यावेळी त्यांनी आपल्याला सुरक्षा देण्याची मागणी करत आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. परंतु राजेंद्र शुक्ल यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान आमदार नीलम मिश्रा यांचे पती अभय मिश्रा आणि मंत्री राजेंद्र शुक्ल यांच्यामध्ये आधीपासून वैर असल्याची माहिती आहे. त्यामुळे ते त्रास देत असतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
COMMENTS