नाशिक – शिक्षक पदवीधर मतदार संघाचे भाजपचे आमदार डॉ. अपूर्व हिरे यांची पाऊले सध्या राष्ट्रवादीच्या दिशेने जात असल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच छगन भुजबळांच्या पाठिंब्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. तसेच काही दिवसांपूर्वी हिरे यांनी छगन भुजबळ यांचीही भेट घेतली होती. यावरुन त्यांची पाऊले भाजप सोडून राष्ट्रवादीच्या दिशेने जातायत की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान भाजपचे सरकार आल्यानंतर त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या मात्र भाजपकडून पाहिजे तसा मानसन्मान मिळत नसल्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याचं बोललं जात आहे.लोकसभा अथवा विधानसभा पश्चिम विभागातून निवडणूक लढविण्याची इच्छा असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. कट्टर राजकीय वैर असलेले छगन भुजबळांच्या भेटीनंतर त्यांच्यातील मनोमिलनाबद्दलचे किस्सेही शहरात चर्चेचा विषय ठरले होते. डॉ. हिरे यांच्या प्रचाराचा नुकताच औपचारिक कार्यक्रम संपन्न झाला आहे. यावेळी छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय दिलीप खैरे हेही उपस्थित होते. यावरुन भविष्यात जिल्ह्यातील राजकारणात काहीतरी उलथापालथ नक्कीच होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS