अजित पवारांच्या कानात काय सांगितलं ?, भाजप आमदार बाळा भेगडे म्हणतात…

अजित पवारांच्या कानात काय सांगितलं ?, भाजप आमदार बाळा भेगडे म्हणतात…

पुणे –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि भाजपचे मावळचे आमदार बाळा भेगडे हे काल एका कार्यक्रमानिमित्त एकत्रित आले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी एकमेकांच्या कानात गुफ्तगू केल्याचे फोटो व्हायरल झाले. त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत मावळमध्ये चर्चा रंगली होती.  यावर आमदार बाळा भेगडेंनी स्पष्टीकरण दिल असून बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितलं असल्याचं भेगडेंनी म्हटलं आहे.

दरम्यान काल मावळ येथील कान्हे फाटा येथे रवी भेगडे यांनी सामुदायिक सोहळ्याचं आयोजन केलं होतं. या सोहळ्याला अजित पवार यांनी हजेरी लावत तेथील स्थानिक आमदार बाळा भेगडे यांच्याशी सात-आठ मिनिटे चर्चा केली. यावेळी युतीचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणेही शेजारीच होते. पण अजित पवार यांनी बारणेंशी बोलणं टाळलं. पण बारणेंना सोडून बाळा भेगडेंशी केलेल्या चर्चेमुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीनंतर आज भेगडे यांनी प्रतिक्रिया दिली असून बारामतीची जागा आम्हीच जिंकू, असं अजित पवारांच्या कानात सांगितलं असल्याचं भेगडेंनी म्हटलं आहे.

COMMENTS