‘तो’ प्रश्न विचारताच संजय निरुपम म्हणाले मला इरिटेट करु नका !

‘तो’ प्रश्न विचारताच संजय निरुपम म्हणाले मला इरिटेट करु नका !

मुंबई – काँग्रेसचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून उमेदवार असलेले संजय निरुपम यांनी मला इरिटेट करु नका असं म्हटलं आहे. निरुपम यांना मनसेविषयी प्रश्न वचारला असता त्यांनी मला इरिटेट करु नका असं म्हटलं आहे. निरुपम यांना मनसेच्या सभांविषयी विचारले असता मनसेची रेकॉर्डिंग चालवू नका, माझा जीव राहू द्या ना, असं म्हटलं आहे.

तसेच कोण कुठे सभा घेईल हा ज्याचा त्याचा प्रश्न असून माझी मनसेबद्दल काही नाराजी नाही, त्यांच्या सभांना विरोध नसल्याचही निरुपम यांनी म्हटलं आहे. तसेच यावेळी प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्यावर निरुपम यांनी टीका केली आहे. गजानन किर्तीकर म्हणजे नॉन परफॉर्मिंग अॅसेट आहेत. ते आता काहीही करु शकत नाहीत. किर्तीकरांना शिवसैनिकांचाच विरोध आहे. त्यांना शिवसैनिकच पाडणार असल्याचं निरुपम यांनी म्हटलं आहे.

COMMENTS