40 हजारांच्या जमावानं जाळलं भाजप आमदाराचं घर !

40 हजारांच्या जमावानं जाळलं भाजप आमदाराचं घर !

राजस्थान – राजस्थानामध्ये ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलाविरोधात सलग दुस-या दिवशीही आंदोलन सुरूच असल्याचं पहावयास मिळालं आहे. संतप्त झालेल्या जामावानं भाजपच्या दलित आमदाराचं घर जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली असून करोली येथील भाजपच्या दोन दलित नेत्यांची घरं आंदोलकांनी जाळली आहेत. भाजपचे दलित आमदार राजकुमारी जाटव यांचं घर आंदोलकांनी पेटवलं असून या घटनेत तब्बल ४० हजारांचा जमावाने भाजप आमदाराच्या घरावर हल्लाबोल केल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान संतप्त झालेल्या या जमावानं आजूबाजूंच्या गाड्यांची आणि घरांचीही तोडफोड केली असल्याचं समोर आलं आहे. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या आंदोलकांनी करोलीतील भाजपच्या माजी आमदाराचंही घर जाळलं आहे. त्याचबरोबर इथल्या शॉपिंग मॉलची तोडफोड केली असल्याची माहिती आहे. जमावानं आज केलेल्या या आंदोलनामुळे ऍट्रॉसिटी कायद्यातील बदलाला दलितांनी जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे याबाबत सरकार या निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS